
Vivo आयपीएल 2021 चे शीर्षक प्रायोजक असेल
दि.11 : चिनी कंपनी विवो IPL 2021 ची प्रायोजक असेल. (Chinese company Vivo will be the sponsor of IPL 2021) 2022 ते 2023 पर्यंत ही कंपनी प्रायोजक म्हणून कायम राहील. मागील …
मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …
सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …
मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …
दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …
सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …
सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …
दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …
मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …
दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …
दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …
दि.11 : चिनी कंपनी विवो IPL 2021 ची प्रायोजक असेल. (Chinese company Vivo will be the sponsor of IPL 2021) 2022 ते 2023 पर्यंत ही कंपनी प्रायोजक म्हणून कायम राहील. मागील …
दि.11 : चिनी कंपनी विवो IPL 2021 ची प्रायोजक असेल. (Chinese company Vivo will be the sponsor of IPL 2021) 2022 ते 2023 पर्यंत ही कंपनी प्रायोजक म्हणून कायम राहील. मागील वर्षी ड्रीम 11 आयपीएलचा प्रायोजक होता.
Vivo पुन्हा एकदा आयपीएलचा प्रायोजक असणार आहे. 2018 ते 2022 पर्यंत Vivo कडे आयपीएलचे प्रायोजकत्व हक्क होते, परंतु गेल्या वर्षी विवो आणि बीसीसीआयने मिळून आयपीएलचे प्रायोजक मधून विवोला 2020 मध्ये वगळले. आता विवो 2023 पर्यंत पुन्हा आयपीएलचा प्रायोजक असेल. (Vivo will be the title sponsor of IPL 2021)
चिनी स्मार्टफोन कंपनी विवो पुन्हा एकदा आयपीएलची टाइटल स्पॉन्सर असेल. आयपीएल 2020 मध्ये विवोची जागा ड्रीम 11 ने घेतली होती, पण आता विवो प्रायोजक म्हणून परत आला आहे.
भारत आणि चीनमधील सीमा विवादानंतर बीसीसीआयने लोकांच्या भावना लक्षात घेता विवोबरोबर वर्षभरासाठी हा करार रद्द केला होता. मात्र, यामागील कारण काय होते, हे बीसीसीआयने सांगितले नव्हते.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले की, विवो आयपीएलसह परत आला आहे. मागील हंगामात विवोबरोबर प्रायोजकांचा करार संपुष्टात आला असला तरीही, बीसीसीआयने 2022 पर्यंत विवोबरोबर आयपीएल प्रायोजकतेचा करार केला आहे.
चिनी कंपनी विवोने 2018 ते 2022 पर्यंत बीसीसीआयला सुमारे 2,190 कोटी रुपये देऊन आयपीएलसाठी शीर्षक प्रायोजकत्व मिळवले आहे. यापूर्वी 2015 मध्ये, विवोला आयपीएलची प्रायोजकत्व देण्यात आले होते.
आयपीएलची प्रायोजकत्व विवोकडून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याने आता 2023 पर्यंत विवोला एका वर्षासाठी वाढीव प्रायोजकत्व मिळणार आहे.
दि.10 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra singh Dhoni) हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनी कर्णधार कसा झाला? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि …
दि.10 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra singh Dhoni) हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनी कर्णधार कसा झाला? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी रांचीमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं. शरद पवार (Sharad Pawar) हे 2005 ते 2008 दरम्यान BCCI चे अध्यक्ष होते.
झारखंडच्या दौऱ्यावर आलेले शरद पवार म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या धरतीवर जन्मलेल्या महेंद्र सिंह धोनीने संपूर्ण झारखंडचं नाव रोशन केलं आहे. एक घटनेचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार असताना राहुल द्रविडने मला विचारले की, कर्णधारपदावर असल्याने त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याला राजीनामा द्यायचा आहे.
सचिन तेंडुलकरने सूचवला होता पर्याय
शरद पवारांनी म्हटलं की, राहुल द्रविडने राजीनामा देण्याबाबत विचारणा केली असता मी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कर्णधारपद घेण्यासाठी सुचवलं होतं. पण सचिनने ही जबाबदारी सांभाळण्यास नकार दिला. तर मी सचिनला विचारलं की, तर मग ही जबाबदारी कोणाला देऊ. त्यावर तेंडुलकरने धोनीच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्याचा सल्ला दिला. तो देशाचं नाव उंचावर नेईल. आणि नंतर तसंच झालं.
महेंद्रसिंह धोनीने 2014 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनीची जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. धोनीने 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. येथून धोनीने नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. एक उत्तर फिनीशर म्हणून त्याची ओळख झाली. त्यानंतर त्याचा प्रवास सर्वात यशस्वी कर्णधारपर्यंत येऊन पोहोचला.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 साली पहिलाा टी-20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला. धोनाच्या नावावर 17 हजार धावा आहेत. तसेच टी-20, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धा जिंकणारा महेंद्रसिंह धोनी हा पहिला कर्णधार आहे.
अहमदाबाद,दि.24 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण करण्यात आले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन केलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे …
अहमदाबाद,दि.24 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण करण्यात आले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन केलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नावाने ओळखलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
असे आहे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.
Gujarat: President Ram Nath Kovind inaugurates Narendra Modi Stadium, the world's largest cricket stadium, at Motera in Ahmedabad
— ANI (@ANI) February 24, 2021
Union Home Minister Amit Shah, Gujarat Governor Acharya Devvrat, Sports Minister Kiren Rijiju, and BCCI Secretary Jay Shah also present pic.twitter.com/PtHWjrIeeH
या उद्घाटन सोहळ्याला अमित शाह यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. अमित शाह यांनी म्हटलं की, आज खेळ जगतासाठी सुवर्ण दिन आहे. आज भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावे मोठ्या स्पोर्ट्स कॉम्लेक्सचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.
सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था असणार आहे. देशातील आणि जगातील सर्व खेळाडूंच्या ट्रेनिंग आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी 3000 मुलांची एकाचवेळी खेळण्याची आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.
दि.18 : दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएलच्या लिलावात इतिहास रचला आहे. 33 वर्षीय मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटीमध्ये खरेदी केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू बनला आहे. या प्रकरणात त्याने …
दि.18 : दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएलच्या लिलावात इतिहास रचला आहे. 33 वर्षीय मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटीमध्ये खरेदी केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू बनला आहे.
या प्रकरणात त्याने युवराजसिंगला मागे टाकले आहे. युवराजला 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटींमध्ये खरेदी केले होते. तसंच आफ्रिकी विराट कोहलीनंतर तो आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू बनला आहे.
आरसीबीचा विराटचे मानधन 17 कोटी आहे. लिलावात मॉरिसने आपली आधारभूत किंमत 7.5 दशलक्ष ठेवली. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही मॉरिसला विकत घेण्यासाठी संघर्ष केला, पण अखेर राजस्थानने बाजी मारली.
आयपीएल लिलाव: सर्वात महाग खेळाडू
दि.1 : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 21 जानेवारीला आई-बाबा बनले. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी त्यांच्या मुलीचा पहिला …
दि.1 : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 21 जानेवारीला आई-बाबा बनले. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी त्यांच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. याचसोबत त्यांनी मुलीचं नावही जाहीर केलं आहे. विराट आणि अनुष्काने मुलीचं नाव वामिका (Vamika) असं ठेवलं आहे. याबाबतची इन्स्टाग्राम पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे.
‘आम्ही प्रेम, जिव्हाळ्याने आमचं आयुष्य जगत आलो आङोत. पण या छोट्या वामिकाने आमच्या जगण्याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. अश्रू, हसणं, भावना या सगळ्या गोष्टी आम्ही काही क्षणांमध्येच अनुभवतो. आम्हाला झोप मिळत नाही, पण आमचं मन प्रेमाने पूर्णपणे भरलं आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशिर्वादाबाबत धन्यवाद,’ अशी पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 21 जानेवारीला आई-बाबा बनले. तेव्हापासूनच अनेकांनी त्यांना मुलीचं नाव सुचवलं होतं. मुलीच्या जन्माआधी विराट कोहली पितृत्वाची रजा घेऊन ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. 5 फेब्रुवारीपासून या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे.
सोलापुर,दि.18 : सिद्धेश्वर सोशल फाऊंडेशन चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे उदघाटन मनपाचे उपआयुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, मनोरमा बँकेचे माजी चेअरमन संतोष सुरवसे, …
सोलापुर,दि.18 : सिद्धेश्वर सोशल फाऊंडेशन चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे उदघाटन मनपाचे उपआयुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, मनोरमा बँकेचे माजी चेअरमन संतोष सुरवसे, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोशियन निवड समिती चेअरमन उदय ढोके, उद्योगपती समीर लोंढे, कॉन्ट्रॅक्टर सतीश सुरवसे, नामवंत खेळाडू किशोर बोरामणी, संस्थेचे अध्यक्ष आनंद मुस्तारे कार्याध्यक्ष विजयकुमार हतुरे, उपाध्यक्ष रेवणसिद्ध बिजर्गी, सचिव विकास कस्तुरे, प्रसिद्धीप्रमुख विशाल कल्याणी, सदस्य आशिष रसवंती आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपायुक्त धनराज पांडे म्हणाले की, मैदानी खेळातून मुलांच्या शारीरिक विकास होत असतो अलीकडे मुलांचा कल मैदानातील खेळाकडे नसून प्रत्येक जण हा मोबाईल मध्ये गुंतलेला असतो. तसेच शहरातील सामाजिक राजकीय संस्थेने देखील पुढाकार घेऊन चांगल्या दर्जेचे ग्राउंड तयार केले पाहिजेत IPL मूळे अनेक चांगले खेळाडू तयार झाले आहेत. असेच चांगले स्पर्धक सोलापुरातून घडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्री सिध्देश्वर महायात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी श्री सिध्देश्वर चॅम्पियन ट्रॉफी- 2021 चे आयोजन दि. 18 ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.
ही स्पर्धा आयपीएल धर्तीवर होणार असून, यासाठी सोलापूरातील नामवंत 06 संघात 14 वर्षाखालील मुलांची ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी विजेते संघास व उपविजेते संघास सिध्देश्वर चॅम्पियन ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. व दररोज होणार्या स्पर्धेत (मॅन ऑफ दी मॅच) मध्ये खेळाडूंना ट्रॉफी देण्यात येणार आहे. मॅन ऑफ दी सिरिज, खेळाडूला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण 25 जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश यमुल, दत्ता बडगु, प्रसाद सावनतुल आदी परिश्रम घेत आहेत.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोलकाता,दि.2 : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सौरव गांगुलींवर रुग्णालयाकडून अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत, सौरव गागुंलीची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. हर्षा भोगले यांनीही गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे अशी असं म्हटलं आहे.
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family!
बातम्यांसाठी व ताज्या अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुपमध्ये हा नंबर 👉 9404996361 ॲड करा किंवा आपले नाव, शहर/गावाचे नाव व्हाट्स ॲप करा
England tour of India: Schedule announced, two Tests including day-night in Motera
अहमदाबाद,दि.10 : अहमदाबाद (गुजरात) मध्ये नव्याने बांधले गेलेले मोटेरा स्टेडियम येथे 24 फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील ही तिसरी कसोटी असेल. याशिवाय इंग्लंड मालिकेची चौथी कसोटी (4-8 मार्च) येथे खेळली जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी सांगितले की, इंग्लंड दौऱ्यासाठी फेब्रुवारी-मार्च (2021) मध्ये रोटेशन धोरणाचा एक भाग म्हणून चेन्नईने कसोटी मालिकेच्या इतर दोन सामन्यांचे आयोजन केले (5 फेब्रुवारीपासूनची पहिली कसोटी, 13 फेब्रुवारीपासूनची दुसरी कसोटी) केले आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात (23-28 मार्च) खेळली जाईल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी मोटेराला गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या इंडोर अॅकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी डे-नाईट टेस्ट आयोजित करण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी ईडन गार्डन्स येथे बांगलादेशविरूद्ध डे-नाईट कसोटीनंतर गुलाबी बॉलसह भारतीय भूमीवरील हा दुसरा सामना असेल.
बीसीसीआयने सांगितले की, “चेन्नई मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करणार आहे, तर इतर दोन कसोटी सामने अहमदाबादच्या सरदार पटेल मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील.”
BCCI ने सांगितले की, ‘मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे ज्याची क्षमता एक लाख 10 हजार प्रेक्षकांची आहे. डे-नाईट कसोटीनंतर 5 सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका अहमदाबादमध्ये खेळली जाईल.
इंग्लंडच्या या दौर्याच्या शेवटच्या टप्प्यात तीन एकदिवसीय सामन्यांची एकदिवसीय मालिका पुण्यात खेळल्या जातील. या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीसीआयने देशातील विद्यमान परिस्थिती (कोविड – 19) पाहता दौर्याचे सामने तीन ठिकाणी मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”
🏟️ Ahmedabad's new Motera stadium will host the last two Tests of #INDvENG, including the day/night affair in the third game.
— ICC (@ICC) December 10, 2020
The five-match T20I series will also be played here 🤩 pic.twitter.com/TlDWjHJGEN
शाह म्हणाले की, “दोन्ही क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय आणि ईसीबी) जागतिक क्रिकेटच्या दोन सामर्थ्यवान संघांमधील स्पर्धात्मक सामन्यांच्या रोमांचक मालिकेसाठी एकत्र काम केले आहे.”
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, “बीसीसीआयने चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या तीन ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट घेण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.”
टेस्ट सीरीज –
पहिली टेस्ट: 5 से 9 फरवरी: चेन्नई
दूसरी टेस्ट: 13 से 17 फरवरी: चेन्नई
तीसरी टेस्ट: 24 से 28 फरवरी: अहमदाबाद
चौथी टेस्ट: 4 से 8 मार्च: अहमदाबाद
टी20 अंतरराष्ट्रीय सीरीज-
पहला टी20 अंतरराष्ट्रीय सामना 12 मार्च : अहमदाबाद
दूसरा टी20 अंतरराष्ट्रीय सामना 14 मार्च : अहमदाबाद
तीसरा टी20 अंतरराष्ट्रीय सामना 16 मार्च : अहमदाबाद
चौथा टी20 अंतरराष्ट्रीय सामना 18 मार्च: अहमदाबाद
पाचवा टी20 अंतरराष्ट्रीय सामना 20 मार्च : अहमदाबाद
वनडे सीरीज –
पहला वनडे: 23 मार्च : पुणे
दूसरा वनडे: 26 मार्च : पुणे
तीसरा वनडे: 28 मार्च : पुणे
मुंबई,दि.1 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने मुंबईमध्ये गरजू मुलांसाठी एसआरसीसी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार करत आहे. एकम फाऊंडेशनच्या मदतीने सरकारी आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू मुलांना सचिन आर्थिक …
मुंबई,दि.1 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने मुंबईमध्ये गरजू मुलांसाठी एसआरसीसी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार करत आहे. एकम फाऊंडेशनच्या मदतीने सरकारी आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू मुलांना सचिन आर्थिक मदत करतो.
सचिनने पुन्हा एकदा सामाजिक भान जपलं आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने 6 राज्यांमधल्या 100 गरीब विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च उचलला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या विद्यार्थ्यांची मदत सचिन करणार आहे. नोव्हेंबर 2019 सालापासून सचिन त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून हे सामाजिक काम करत आहे.
अनेकवेळा गरीब मुलांच्या पालकांना त्यांच्या गंभीर उपचारांसाठीचा खर्च करणं परवडत नाही, अशा गरजू मुलांचा उपचारासाठीचा खर्च सचिन उचलतो. या महिन्याच्या सुरुवातीला सचिनने ईशान्य भारतातल्या आसाम, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात मुलांच्या उपचारासाठी लागणारी साहित्य पुरवली होती. याचा फायदा एका वर्षात दोन हजार मुलांना होणार आहे. सचिनने युनीसेफच्या जागतिक बालदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातही सहभाग नोंदवला होता. जगाचं भविष्य घडवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता.
दि.26 : न्यूझीलंडच्या दौर्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सहा खेळाडू कोविड – 19 पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी न्यूझीलंड क्रिकेट प्रशासनाने ही माहिती दिली आहे. …
दि.26 : न्यूझीलंडच्या दौर्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील सहा खेळाडू कोविड – 19 पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी न्यूझीलंड क्रिकेट प्रशासनाने ही माहिती दिली आहे. पाकिस्तान संघाला न्यूझीलंडमध्ये 3 टी -20, दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला टी 20, 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
यामुळे पाकिस्तानी संघात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी न्यूझीलंड सरकारलाही धक्का बसला आहे कारण तेथे कोरोनाची शून्य प्रकरणे आहेत. न्यूझीलंड सरकारचे म्हणणे आहे की तपासणी पूर्ण होईपर्यंत खेळाडूंच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या सहा खेळाडूंना कठोर क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल.
न्यूझीलंडचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की लाहोर येथून निघण्यापूर्वी सर्व 53 खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या लक्षणांवर लक्ष ठेवले गेले. 24 नोव्हेंबर रोजी, न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात पोहोचल्यावर त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी दोन खेळाडूंना कोरोना संसर्ग बऱ्याच काळापासून झाल्याचा संशय आहे.
न्यूझीलंडचे सरकार म्हणणे आहे की आता आइसोलेशन काळात खेळाडूंची किमान चार वेळा कोरोना टेस्ट केली जाईल. तसेच, सर्व खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये रहावे लागेल. सरकारच्या म्हणण्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की कडक सूचना असूनही अनेक खेळाडू आइसोलेशन नियमांचे उल्लंघन करत फिरत असल्याचे दिसून आले.