मुंबई,दि.23 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.(Revised schedule of 10th and 12th examinations announced) प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Exam: Announced the revised schedule for the 10th and 12th exams)
दहावी- बारावीचं सुधारित वेळापत्रक
दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे
दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21 मे ते 10 जून
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून
40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवणार आहे. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवणार आहे. सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहा, असे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चं लेखन साहित्य वापरणं बंधनकारक असणार आहे.
विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात 3.00 वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 1 ते दीड तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.