• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.21 : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील फिल्म निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अश्लील फिल्म बनविणे आणि त्यांचे काही अ‍ॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पॉर्नोग्राफी हा जगातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक म्हणून ओळखला जातो. युरोप अमेरिकेतील काही देशांमध्ये हा व्यवसाय करणं अधिकृत आहे. मात्र भारतात पॉर्नोग्राफीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे काही निर्माते अनधिकृतरीत्या अश्लील चित्रपटांची निर्मिती करतात. अशाच एका प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष तो हा व्यवसाय करतोय. या व्यवसायातून मिळाणाऱ्या नफ्याचा आकडा पाहून तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक ॲप चालवते. या ॲपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. राजने या ॲपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.

हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!