• Solapur
 • April 20, 2021
5 Comments

सोलापूर, दि. 29: जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकाचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी ही माहिती ऑनलाईन पद्धतीने क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) मोबाईलॲपद्वारे आणि customer.service@bhartiaxa.com या ईमेलवर किंवा तालुका कृषी कार्यालयात नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे. या ॲपद्वारे माहिती प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विमा प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल शासनाला सादर करतील. त्यानंतर ज्यांनी पीक विमा भरलेल्या आहे, अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती दाखल करण्याचे आवाहन रवींद्र माने यांनी केले आहे.

तालुकानिहाय विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. अक्कलकोट (दशरथ यळसंगे-8788268798), दक्षिण सोलापूर (अजित सावंतराव-9175020091, उत्तर सोलापूर (नागेश भरडे-8788798766), मोहोळ (संदीप कीपनर-9511935999), पंढरपूर (विष्णू गायकवाड-9146868127), मंगळवेढा (बसवराज सुतार-860554177), सांगोला (चेतन खटकाळे-9665698566), माळशिरस (उमेश पळसे-7083697172),बार्शी (किशोर वळसे-9960997899), माढा (आकाश नवसारे-9665283814) आणि करमाळा (अक्षयकुमार रेगुडे-8459601881).

Author

aajtaksolapurnews@gmail.com

5 thoughts on “पीक विमा नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन माहिती दाखल करण्याचे आवाहन

 1. .म गंगाधर अशोक माने मु.किणी.त.आकलकोट.जि.सोलापूर.आमचे.ऊडिद.पुरन.पने.आतिपवसाने.नुसकान.झाले.आहे

  1. वैराग गट नं 53 पावसामुळे अतोनात नुकसान झालं संपूर्ण क्षेत्र ज्वारी आडवी झाली

 2. सोलापुर जिल्हयातील अती पावसामुळे सौंदरे येथील
  सर्ह्वे नंबर 9/2मधील कांदा 0.5 व तुर 0.5हेक्टर चे पिक
  नामशेष झाले आहे…Pradhanmantri fasal bima
  Yojana Receipt no. 040127200190322587
  Dated 14/07/2020…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *