• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.२१ : माढा सबजेल मधून पळालेल्या चार आरोपीपैकी आणखी एक आरोपी कुर्डुवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून आतापर्यंत दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून अद्याप दोन आरोपी फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की माढा सबजेलमधून अकबर सिद्धाप्पा पवार या आरोपीस फिट आल्याचा बनाव करुन सिद्धेश्वर शिवाजी केचे रा.दारफळ ता.माढा, आकाश उर्फ अक्षय राॅकी भालेकर रा.डिडुळगाव जि.पुणे,तानाजी नागनाथ लोकरे रा.लऊळ ता.माढा, अकबर सिद्धाप्पा पवार रा.कुर्डू ता.माढा या चौघा आरोपींनी कर्तव्यास असणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की करुन जेलमधून पळ काढला होता.

यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला असता यातील एक आरोपी आकाश उर्फ अक्षय राॅकी भालेकर हा कालच निमगांव मा येथे माढा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर आज कुर्डुवाडी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील पोस्कोखालील आरोपी तानाजी नागनाथ लोकरे (रा.लऊळ)कुर्डुवाडी रेल्वेस्थानकात कोणत्यातरी रेल्वेने पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी चिमणाजी केंद्रे व त्याचे सहकारी पो.काॅ.नितीन गोर,दत्ता सोमवाड,सिद्धनाथ वल्टे यांनी सापळा रचून त्याला कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात सकाळी ९ वा. सुमारास त्याला पकडले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!