• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

बीड,दि.१७ : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात अजून रुग्ण संख्या वाढत आहे. बीड (Beed) जिल्ह्यात काही भागात कोरोनाचा कहर कायम असल्याने प्रशासनाने पुन्हा निर्बंध कडक (Beed Strict Lockdown) करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई आणि पाटोदा या तीन तालुक्यांमध्ये दुकाने खुली ठेवण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसंच नागरिकांच्या हालचालींवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत. (Announcement of strict restrictions in 3 talukas of Beed district; These are the new rules)

आष्टी,पाटोदा आणि गेवराई तालुक्यात उद्यापासून दुकाने फक्त सकाळी ७ ते १२.३० या वेळेत सुरू राहतील. त्यामुळे दुपारी १ नंतर केवळ अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी राहील. आवश्यकता नसतानाही दुपारी १ नंतर घराबाहेर पडल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शनिवार आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. वीकेंडला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेली दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. या नवीन निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर जारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणाला परवागनी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण जर गृह विलगीकरणात असतील तर स्थानिक प्रशासनाने योग्य ती कार्यवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहरांतील एखाद्या भागात जर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर स्थानिक प्रशासनाने त्या भागास कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करावं, असंही प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!