• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

सोलापूर,दि.7 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील सलून दुकाने बंद करण्याचा शासनाकडून देण्यात आलेला आदेश चुकीचा आणि नाभिक समाजावर अन्यायकारक आहे. तातडीने सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आल्याची माहिती संत सेना नाभिक संघटनेचे अभयकुमार कांती यांनी दिली.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मिनि लॉकडाऊन सुरू केले त्यामध्ये सलून दुकाने पूर्णपणे 30 एप्रिल पर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाभिक समाज हा गरीब आहे. गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाभिक समाजातील 16 जणांनी आत्महत्या केली आहे. त्याची दखल शासनाने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. कायम नाभिक समाजावर अन्याय आणि दुर्लक्ष केले जाते.

व्यवसायातील वाढती स्पर्धा, वाढती महागाई यामुळे नाभिक समाजातील लोकांना पुन्हा या वर्षीच्या मिनि लॉकडाऊनमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक कुटुंब सलून दुकानावरच अवलंबून आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. पूर्ण लॉकडाऊन न करता आठवड्यातील काही दिवस सलून दुकानांना सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा सर्व नाभिक समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असेही या निवेदनात सांगितले. श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ व सेवाभावी संस्थेच्या वतीने हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगर पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष आनंद सिंगराल, सिद्राम रूद्रार, अभयकुमार कांती,अनिल कोंडूर, राकेश सिंदगीकर,मोहन जमदाडे, भारत भाऊ क्षिरसागर, सुरेश हडपद, शेखर कोंढापुरे, आनंद राऊत,प्रकाश शिंदे, गोवर्धन कोडपाक, चंद्रमौळी तमनूर, राजू हडपद, जितेंद्र बेळनाकर, श्रीनिवास रासकोंडा,अजय तमनूर आदी उपस्थित होते.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *