
शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा
मुंबई, दि. 22 :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषितला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
कोरोना संकटामुळे लागू टाळेबंदीचा फटका राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसला असून शिक्षक बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित आज सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, दत्रात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे आदींनी उपस्थित केलेल्या शिक्षणविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील शाळांचे अनुदान, वाढीव मान्यता व शिक्षकांच्या संदर्भात मागील सरकारने सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या अटी शिथील करुन संबंधितांना मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा तसेच मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे ठरवण्यात आले. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, तसेच वित्त व शालेय शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते.
Vichar karun nirnay ghya dada khup avgad zal jagan aheb
दादा प्रचलित नियमाने अनुदान दया. म्हणजे शिक्षकांना शिकवण्याचे सोडुन दरवर्षी आंदोलन करण्याची गरज नाही पडली पाहिजे. तरच शिक्षक आदर्श व सुशिक्षित भावी पिढी घडवु शकेल. आदरणीय पवार साहेब व दादा आपणच शिक्षकाचे कैवारी आहेत. आपल्या हातून शिक्षकांचे भवितव्य उज्ज्वल करा.
100% अनु दान द्या दादा खूप वर्ष झाल फुकट काम करत आहोत.
R/a deputy cm of maharashtra,I humble requested to life is full risk uncertain arise many illness that’s corona,heartattack,sugar,BP,cancer etc in this time necessary old pension is must,please immediate start for the old pension I am one of the physically handicapped teacher begging to you secure our family uncertain death,I hope you bless all the teachers.thanking you….yoursfaithfully I.s.madagunaki.kles teacher in akkalkot and ph candidate. Bless amit dada means annadata your name is for ever dada.
अनुदान न देण्यामध्ये अमानवीय वृत्ती दिसते.
दादा, विचार व्हावा
दादा,
मी शिक्षक नाही,
पण शिक्षण सेवकांची खूप वाईट परिस्थिती आहे,
त्यांना 6000 ₹ पगार आहे.
पिंपरी चिंचवड सारख्या शहरात कसे भागणार त्यांचे,
त्यांचा काहीतरी विचार करावा.