• Solapur
  • August 2, 2021
0 Comments

दि.१८ : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. रुग्णांची संख्या अनेक जिल्ह्यात कमी होत असल्याने निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र काही जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या शंभर दिवसांपासून बंद असलेली दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दुकाने उघडणार की नाही याबाबतचा संभ्रमही दूर झाला आहे. सोमवारपासून जिल्ह्यात सरसकट सगळी दुकाने उघडणार आहेत. दरम्यान, दोन महिन्यानंतर जिल्ह्यात शनिवारी प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन महिने कोरोनाचा कहर सुरू आहे. रोज दीड हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. याशिवाय रोज पंचवीस ते तीस जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. पॉझिटिव्हिटी दरही दहा टक्केपेक्षा अधिक असल्याने कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यात होता. यामुळे केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी होती. तीन महिने दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास परवानगी मागितली पण प्रशासनाने त्यास नकार दिला होता. दुकाने उघडल्यास कारवाई करण्याची भूमिका घेतल्याने वादावादी होत होती.

या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी व्यापाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. त्यांनी प्रथम दुकाने उघडण्यास परवानगी दिली, नंतर आपला निर्णय मागे घेतला. यामुळे गोंधळ आणखी वाढला होता. अखेर प्रशासनाने शनिवारी नवीन आदेश काढत सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिली. सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेले दोन महिने रोज दीड हजार कोरोना बाधित आढळत असताना शनिवारी हा आकडा हजाराच्या आत आला. शिवाय मृतांचा आकडाही वीसपेक्षा कमी आला असून कोरोनामुळे अठरा जणांचा बळी गेला.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!