• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.22 : चित्रपटात अनेकवेळा अपघाताचे सीन दाखवले जातात. हे अपघाताचे सीन अंगावर शहारे आणणारे असतात. बॉलीवूड व हॉलिवूड चित्रपटात अनेकवेळा अपघाताचे सीन पाहिले असतील मात्र असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media Viral) होत आहे. ज्यात दोन वाहनांचा अपघात होतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लाल रंगाची गाडी वेगानं येत आहे. त्याचवेळी शेजारहून भरधाव गाडी येते आणि लाला गाडीला जोरात धडक देते. या गाड्य़ांचं नुकसान तर होतच शिवाय आजूबाजूच्या भिंतीचं आणि गेटचंही नुकसान या अपघातात होतं. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकदा नाही तर दोनवेळा हा प्रकार घडला आहे. तीन दिवसांनी पुन्हा एकदा दोन काळ्या रंगाच्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. या दोन्ही घटना एकाच ठिकाणी घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!