• Solapur
  • August 2, 2021
0 Comments

सोलापूर,दि.२१ : बनावट कागदपत्रे तयार करून मुरारजी पेठ अभिषेक नगर येथील जमीन हडप केल्याप्रकरणी सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे आणि लता जाधव या दोघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश नागनाथ पवार (वय ३७, रा. अभिषेक पार्क, धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

यात हकिकत अशी की, मनोहर सपाटे यांनी सन १९९३ ते १९९४ या कालावधीमध्ये स्वतःच्या महापौर पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीपणे हेतुन, संगनमताने खोटे बोगस व बनावट कागदपत्रे तयार करुन अभिषेक नगर, मुरारजी पेठ येथील टी पी-४, फायनल फ्लॅट नं. १०६, क्षेत्र ७८६३ चौ.मी या जमिनीचे शासकिय किंमतीच्या २५ टक्के रक्कम भरल्याचे खोटे दाखवुन, सदर जागेची खरेदी करुन ती जागा ताब्यात घेवुन शासनाची करोडो रुपयांची जमीन हडप करुन भ्रष्टाचार केला आहे.

तसेच सदर जागाखरेदी करताना संस्थेचे सदस्य नसताना खरेदीखतावर संस्थेचे सचिव म्हणन आरोपीत लता सुदाम जाधव यांनी सही करुन मनोहर सपाटे यांना गैरकारभारात मदत केली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे या करीत आहेत.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!