
2020 अखेरपर्यंत 100 करोड लोकांकडे असेल 5G नेटवर्क
दि.30 : Ericsson ने आपला नवीन Ericsson Mobility अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की सन 2026 पर्यंत 10 पैकी 4 स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी असेल. या व्यतिरिक्त, अहवालात …
मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …
सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …
मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …
दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …
सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …
सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …
दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …
मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …
दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …
दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …
दि.30 : Ericsson ने आपला नवीन Ericsson Mobility अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की सन 2026 पर्यंत 10 पैकी 4 स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी असेल. या व्यतिरिक्त, अहवालात …
दि.30 : Ericsson ने आपला नवीन Ericsson Mobility अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की सन 2026 पर्यंत 10 पैकी 4 स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी असेल. या व्यतिरिक्त, अहवालात असेही म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2020 पर्यंत 1 अब्जाहून अधिक लोकांना 5 जी सुविधा उपलब्ध होईल.
अहवालानुसार 100 कोटी म्हणजेच जगातील एकूण लोकसंख्येच्या 15% लोकांकडे 5G कनेक्टिव्हिटी असेल. याचा अर्थ असा नाही की 100 कोटी लोक 5 जी कनेक्टिव्हिटी वापरतील परंतु याचा अर्थ असा आहे की जगातील 15 टक्के लोक 5 जी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहतात.
सन 2026 पर्यंत 60 टक्के लोक 5G जी कव्हरेज क्षेत्रात राहतील असा दावाही अहवालात करण्यात आला आहे, तर आतापर्यंत 5 जी सदस्यता 3.5. अब्ज म्हणजेच crore 350 कोटींवर पोहोचू शकते.
एरिक्सनच्या अहवालानुसार, वर्ष 2026 पर्यंत भारतातील एकूण स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी 27% लोकांचे 5 जी सब्सक्रिप्शन असेल. याचाच अर्थ 6 वर्षानंतरही भारतात LTE नेटवर्कचा कब्जा असेल. सुमारे 63 टक्के वापरकर्त्यांकडे LTE नेटवर्क असेल. भारतात वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटचा वापर बर्याच प्रमाणात वाढला आहे.
Eknath Khadse reveals the name of a big man in BHR scam
जळगाव,दि.30 : एकनाथ खडसे यांनी आज जळगाव येथे पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्याचे नाव असून ज्याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्थित होत्या.
राज्य सरकारमध्ये सुभाष देशमुख यांना आपण भेटून चौकशी करण्याची विनंती केली होती. 2018 ला मी केंदीय मंत्री राधा मोहन सिंग यांना भेटून घोळ झाल्याचं संगितलं होतं. असे एकनाथ खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्ल्यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्तीकडून दबाव आणण्यात आल्याने तात्पुरती स्वरूपाची चौकशी झाल्याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्याचे खडसे यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता . त्यावर एकनाथ खडसे यांनी नुसता तोंडी बोलणं उपयोग नाही . पूराव्या शिवाय मी बोलत नाही. अशी प्रतिक्रिया देत कुठलेही पुरावे नसताना माझ्यावरती ही आरोप करण्यात आले होते. अनेक वर्ष माझावर अन्याय करण्यात आला. मी पुराव्याशिवाय आरोप करत नसल्याचे एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या चौकशीदरम्यान सापडलेल्या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. याबद्दल बोलताना खडसे म्हणाले, की कोणाचे लेटरपॅड सापडले म्हणून त्याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरून देखील लेटर पॅड नेवू शकतो.
सोलापूर,दि.३० : सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे हगलुर ता.उत्तर सोलापूर या गावाच्या शिवारात, सोलापूर – तुळजापूर हायवे रोडवरील विराज हॉटेल व लॉजिंग याठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी …
सोलापूर,दि.३० : सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे हगलुर ता.उत्तर सोलापूर या गावाच्या शिवारात, सोलापूर – तुळजापूर हायवे रोडवरील विराज हॉटेल व लॉजिंग याठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन दि.२८ / ११ / २०२० रोजी ०४.३० वा पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सोलापूर ग्रामीण, तालुका पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे संयुक्तपणे सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून विराज हॉटेल या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करुन ०५.३० वा छापा टाकण्यात आला.
यातील आरोपी १ ) नितीन बाबूराव ढोणे २ ) हॉटेल मालक महेश रमेश थिटे रा मु.पो.पीर टाकळी ता.मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी पिडीत महिला हिची शारीरिक पिळवणूक करुन तिस वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेवून तिचे कमाईवर स्वत: ची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने सदर आरोपीविरुध्द तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं.७२७ / २०२० अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १ ९ ५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भादविसंक. ३७० ( १ ) ( २ ) ( ३ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक / सुहास जगताप, तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हे करित आहेत. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या भागात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पध्दतीने यापुढेही अनैतिक मानवी वाहतुक प्रतिंबध कक्ष, सोलापूर शहर यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असून शहरातील व ग्रामीण भागातील बेकायदेशीरपणे चालणारे कुंटनखाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे / विशा ) बापू बांगर तसेच सहा – पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोनि / बजरंग साळुखे , सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे कडील मसपोनि / तावरे, व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोसई / प्रशांत क्षिरसागर , पोहेकॉ / ११४२ बंडगर , पोना / ८४६ बंडगर , मपोना / ६३ ९ गवळी , मपोना / ६ ९ ५ ईनामदार , मपोना / ९२९ मुजावर , मपोशि / १४३९ मंडलिक , मपोशि / १५९१ भुजबळ व चालक पोशि / ७२४ गोरे तसेच , सहा.फौ / एच.एस.जाधव, मपोशि / १८७१ वाघचवरे नेम – तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामिण असे संयुक्तपणे उत्कृष्ट व शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.
नवी दिल्ली,दि.30 : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National payments Corporation of India) थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये 1 जानेवारी 2021 पासून 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय …
नवी दिल्ली,दि.30 : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National payments Corporation of India) थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये 1 जानेवारी 2021 पासून 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही. पेमेंट्स बँकेचे लायसन्स असल्यामुळे 30 टक्के कॅपची मर्यादा पेटीएमला लागू होणार नाही.
यूनिफाइड पेमेंट इंटरफेस/UPI एक रियल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे अकाऊंटमध्ये त्वरित ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँकेच्या अकाऊंटमधून त्वरित ट्रान्सफर करू शकता. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंटला अनेक यूपीआय अॅपशी लिंक करू शकता. तर अनेक बँक अकाऊंटना एका यूपीआय अॅपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता.
या निर्णयाबाबत एनपीसीआयने (NPCI) सांगितले की, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. 30 टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल 30 टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.
एनपीसीआयच्या एका पावलामुळे पेटीएमच्या यूपीआय पेमेंट सेवांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पेमेंट्स बँकेचे लायसन्स असल्यामुळे 30 टक्के कॅपची मर्यादा पेटीएमला लागू होणार नाही. हे अॅप थर्ड पार्टी अॅप्सच्या श्रेणीत येत नाही.
नवी दिल्ली,दि.30 : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात …
नवी दिल्ली,दि.30 : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने कोविड -19 लस उत्पादन आणि वितरण यंत्रणा सुरू केली आहे.
भारतातील लस विकसनाच्या प्रगतीवर पंतप्रधान व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. अहमदाबादमधील झायडस, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादमधील भारत बायोटेक या तिन्ही ठिकाणांना पंतप्रधानांनी शनिवारी भेट दिली. पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजीकल ई आणि हैदराबादमधील डॉ. रेड्डीज् येथे सुरू असलेल्या स्वदेशी लस विकसनाच्या प्रगतीचाही त्यांनी आज आभासी आढावा घेतला. नियामक प्रक्रिया आणि संबंधित बाबींबाबतच्या सूचना आणि कल्पना कंपन्यांनी आपल्यासमोर मांडाव्यात असे पंतप्रधानांनी सांगितले. लस आणि तीची उपयुक्तता, वाहतूक, शीतसाखळी अशा संबंधित विषयांबाबत सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.
900 कोटी रूपयांचे कोविड सुरक्षा प्रोत्साहन पॅकेज
कोविड-19 उपचारार्थ स्वदेशी लस विकसनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 900 कोटी रूपयांचे मिशन कोविड सुरक्षा (कोविड सुरक्षा मोहिम) पॅकेज जाहीर केले आहे. कोविड–19 लस विकसन मोहिमेंतर्गत लसीचे वैद्यकीय विकसन, उत्पादन तसेच लस वापरासाठी नियामक सुविधांची पूर्तता लवकरात लवकर करण्यासाठी सर्व उपलब्ध आणि अनुदानीत स्रोतांचे एकत्रिकरण केले जाईल. सुसंवादासाठी समान नियम, प्रशिक्षण, माहिती व्यवस्थापन यंत्रणा, नियामक बाबींची पूर्तता, अंतर्गत तसेच बाह्य गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि अधिमान्यता प्राप्त करणे हे सुद्धा या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्यासाठी भारतीय जैवतंत्रज्ञान संशोधन आणि विकास विभागाला हे अनुदान प्रदान केले जाईल आणि आरोग्यसंबंधी आवश्यक नियामक मंजुरी प्राप्त करून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेंतर्गत ही लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. जैवतंत्रज्ञान विभागाने आतापर्यंत शैक्षणिक आणि उद्योग या दोन्ही स्तरावर एकूण 10 लसींना पाठिंबा दर्शविला आहे आणि आतापर्यंत 5 लसीची मानवी चाचणी सुरू आहे.
भारतीय वैद्यक क्षमतांच्या बाबतीत जागतिक स्तरावर वाढते स्वारस्य
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जेनोवा बायोफार्मा येथे भेट देण्यासाठी शंभर देशांचे राजदूत येत्या चार डिसेंबर रोजी पुण्यात येणार आहेत. स्वीडनने यापूर्वीच ‘जगाची वैद्यकशाळा’ म्हणून भारताची भूमिका मान्य केली आहे आणि कोविड-19 साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेत आरोग्य आणि जीवन विज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. दरम्यान, पोर्टेबल व्हॅक्सीन रेफ्रिजरेशन उपकरणे तयार करण्यासाठी लक्झेंबर्गची बी सिस्टम्स ही कंपनी भारताबरोबर भागीदारी करत आहेत. भारतात लस वितरणाच्या कामी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी लक्झेंबर्गचे पंतप्रधान झेवियर बेटेल यांच्यासोबत आभासी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संवादाचा हा परिपाक आहे.
चंद्रपूर,दि.30 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात …
चंद्रपूर,दि.30 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असंही सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांवर, विश्वस्तांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. परंतु दबावामुळे त्यांनी एक दोन तासात हा व्हिडीओ हटवला. मात्र यानंतर डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते. त्यांची मानसिक आरोग्य फारसं ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
सोलापूर,दि.30 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 152 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 35482 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 32688 झाली आहे तररुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1754 आहे.तर …
सोलापूर,दि.30 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 152 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 35482 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 32688 झाली आहे तर
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1754 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 1040 झाली आहे. यात 748 पुरुष व 292 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1144 अहवाल प्राप्त झाले. यात 992 निगेटिव्ह तर 152 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 85 पुरुष आणि 67 महिलांचा समावेश आहे. आज 4 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 120 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
मास्क न घालणाऱ्या लोकांना कोविड सेंटर येथे सेवा करण्यासाठी पाठविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
सोलापूर,दि.३० सोलापूर शहर नवीन २७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या १०३८७ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ९३९५ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ४३१ आहे.तर आजपर्यंत मृतांची संख्या …
सोलापूर,दि.३० सोलापूर शहर नवीन २७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या १०३८७ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ९३९५ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ४३१ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या ५६१ झाली आहे. यात ३७४ पुरुष व १८७ महिलांचा समावेश आहे
सोलापूर शहर आज ४३४ अहवाल प्राप्त झाले. यात ४०८ निगेटिव्ह तर २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १७ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर २५ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
‘या’ पद्धतीने होणार दहावी-बारावीच्या परीक्षा, एप्रिलमध्ये होणार परीक्षा
दि.30 : Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनला लाँच करण्याआधी या फोनचे खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या फोनच्या फीचर्सपैकी सर्वात जास्त चर्चा Samsung Galaxy …
दि.30 : Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनला लाँच करण्याआधी या फोनचे खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या फोनच्या फीचर्सपैकी सर्वात जास्त चर्चा Samsung Galaxy S21 च्या नवीन व्हाइस अनलॉक फीचर्स (Voice Unlock Feature) ची होत आहे. या नवीन फोनमध्ये व्हाइस कमांड दिली असून फोन आवाजाने चालू-बंद करता येवू शकणार आहे.
Samsung Galaxy S21 मध्ये सध्या Amazone एलेक्सा (Alexa) आणि Google Siri यासारखे फीचर येत आहे. याला कंपनीने बिक्सबी वॉयस (Bixby Voice) चे नाव दिले आहे. त्यामुळे Samsung Galaxy S21 समोर Hi Bixby म्हटले आहे. स्मार्टफोन अनलॉक होईल. फोन च्या लॉक स्क्रीन सिक्यूरिटी सेटिंग्स संबंधी अद्याप काही सविस्तर माहिती समोर आली नाही.
Samsung Galaxy S21 सीरीजला पुढील वर्षी जानेवारीत लाँच केले जावू शकते. याची विक्री फेब्रुवारी पासून सुरू केली जावू शकते.
गॅलेक्सी एस 21 मध्ये तीन मॉडल लाँच केले जाणार आहेत. स्टँडर्ड, प्लस आणि अल्ट्रा असे या फोनचे नाव असू शकते. एस 21 मध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. प्लसमध्ये 6.7 इंचाचा आणि अल्ट्रामध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी एस 21 मध्ये फँटम वॉयलेट, फँटम ग्रे, फँटम व्हाइट आणि फँटम पिंक कलर मध्ये हे फोन आणले जावू शकते. गॅलेक्सी एस 21 मध्ये फँटम सिल्वर, फँटम ब्लॅक, आणि फँटम वॉयलेट मध्ये उपलब्ध केले जातील. तर गॅलेक्सी एस 21 मध्ये अल्ट्रा ला केवळ फँटम सिल्वर आणि फँटम ब्लॅक कलर्स मध्ये आणणार आहे.
सोलापूर, दि. ३० : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२० रोजी होत असून ही प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान …
सोलापूर, दि. ३० : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२० रोजी होत असून ही प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या परिसरात सकाळी ६ वाजेपासून ते मतदान संपेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
हा आदेश जिल्ह्यातील अंतिम मतदान ठिकाण आणि केंद्र संख्येच्या मान्यतेनुसार मतदान केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरासाठी लागू राहतील. या परिसरातील सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कार्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीला मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास लोक प्रतिनिधीत्व अधिनियमामधील तरतुदीनुसार व भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे दंडनिय कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.